आले-पुदिना डिलाइट.

  • आले १ इंच.
  • पूदीना पाने १५-२०.
  • साख्रर ३ च.
  • मिरपूड पाव च.
  • दालचिनी पूड १/२ च.
  • लिंबू रस.१/२च.
  • पाणी ३ कप.
  • चहा पत्ती /कॉफी पूड १/२ च.
१५ मिनिटे
२ जणाना

पाणी उकळण्यास ठेवावे. आले ठेचून टाकावे.पूदीना पाने बारीक चिरून घालावीत.

उकळल्यावर मीरपूड, दालचिनी पूड, साखर  घालावी.थोडे आटल्यावर चहा पत्ती घालावी.

जरा वेळाने मगमध्ये गाळून लिंबू पिळून द्यावे.कॉफी पूड घालायची असल्यास मगमध्येच घालावी.

हे पेय अत्यंत गुणकारी आहे.

आले, मिरपूड..... ‌श्वसनस्ंथेसाठी उपयुक्त.

दालचिनी पूड ....हृदयासाठी उपयुक्त.

पूदिना..... पाचक.

लिंबू....... व्हिटामीन सी.

  नियमित घेतल्यास सारे लहान-सहान आजार दूर पळतात.