पन्हे (वसंतपेय)

  • कैरी (शक्यतो तोतापुरी आंब्याची) १ मोठी
  • गूळ - १ वाटी, साखर - १/२ वाटी
  • वेलची पूड , केशराच्या काड्या ४-५, मीठ चिमूटभर, चारोळ्या- १ चमचा
२० मिनिटे
४-५ जण

प्रथम कैरीचे साल काढून कैरी कुकर मध्ये डब्यात ठेवून, थोडे पाणी घालून उकडून घ्यावी. गूळ वाटीभर पाण्यात भिजत घालावा. कैरी थंड झाल्यावर गर हाताने पिळून घ्यावा. मिक्सर मध्ये गर, गुळाचे पाणी व साखर फिरवून घ्यावे. पातेलीत काढून अंदाजाने २ पेले गार पाणी घालावे. वेलेची पूड, चारोळी , केशर आदी मिसळावे व फ्रिज मध्ये ठेवून द्यावे.

काही जणांना कैरीच्या गुठळ्या राहिलेल्या आवडतात... तेव्हा गर फार वेळ मिक्सर वर फिरवू नये.

आवड असल्यास चिमूटभर हिरवा अथवा पिवळा  खायचा रंग टाकता येईल.

स्वतः