पुस्तकाचा लेखक स्वतः लेखनविषयात व्यावहारिक पातळीवर पारंगत असणे गरजेचे आहे का?

     
व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास आणि तत्सम विषयांवर जगात जी काही पुस्तके प्रकाशित होत असतात त्यांचे लेखक स्वतः त्या विषयांत पारंगत असतात का ? पारंगत असणे गरजेचे असते का ? की त्यांनी फक्त त्या विषयातील संहिता मनात तयार करून कागदावर मांडलेली असते ? 
       उदा. १. व्यवस्थापन विषयावर पीटर ड्रकर हे तज्ज्ञ मानले जातात. ड्रकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील तत्त्वे ते स्वतः वापरीत होते का ? 
       उदा.२. पुरुषांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाबाबतचे पुस्तक नुकतेच पाहिले. लेखक स्वतः प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा असणे गरजेचे आहे का ?   
                    
येथे पुस्तकानुरुप फरक पडेल, असे वाटते.
       उदा.३. पाककृती विषयावरील पुस्तकाच्या लेखिकेला सर्व पाककृती उत्तम तऱ्हेने करता येणे बंधनकारक असावे, असे वाटते. 

एकंदरीत, काय मते आहेत ?