झटपट कुरडई

  • १ कप कोर्नफ़्लोअर
  • १ कप ताक
  • १ कप पाणी
  • चवीनुसार मीठ , हींग
३० मिनिटे
२० ते २५ नग

ताकात  कोर्नफ्लोअर मिसळून घ्यावे.

१ कप पाणी उकळायला ठेवावे. चवीनुसार मीठ , हींग घालावे.

पाणी   उकळल्यावर  आच मंद करून  त्यात ताकातील पेस्ट  हळुहळू  घालत हलवावे.
 
गुठळी होउ देवू नये. पीठ घट्ट होईल व रंग बदलेल . ( पारदर्शक ) 

कुरडई  साठी  पीठ( चीक )  तयार. गरम असतानाच  कुरडया घालाव्यात.

खडखडीत वाळवून ठेवल्या तर वर्षभर टिकतात. गव्हाच्या कुरडई प्रमाणेच लागतात.

गव्हाच्या चीकाला पर्याय. ३ दिवस  भिजवा , वाटा हे काम  वाचते.

व तळल्यावर छान फ़ुलतात.