वाटली डाळ (सोपी पद्धत )

  • भिजवलेली चना डाळ १ वाटी
  • २ हिरव्या मिरच्या , १ चमचा जीरे , मीठ , लिंबू , साखर
  • सजावटी साठी ओले खोबरे , कोथिंबिर
  • फोडणीचे साहीत्य
१० मिनिटे

प्रथम डाळ  मिरची  व जीरे  घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावी .

मायक्रोमध्ये  ५ मिनिटे  झाकण  ठेवून  वाफवून  घ्यावी.  थंड   करून  डाळ मोकळी करून घ्यावी .
 मोहरी , हिंग , कडीपत्याची  फोडणी द्यावी. साखर ,  मीठ घालून  २ मिनीटे  मायक्रो  करावे.
आवडीप्रमाणे  लिंबाचा रस  घालून  , ढवळून  वरती  ओले खोबरे  ,कोथिंबिर  घालून  वाढण्यास तयार वाटली डाळ.

मायक्रोमध्ये  वाफवल्यामुळॅ  डाळ  परतण्याचा खुप वेळ वाचतो . तेल  नीम्मेच  पुरते.

चवीत फरक पडत नाही.

( कुकरमध्ये  भाताबरोबर  वाफवली तरी चालेल. )