डाळीचा चटका

  • हरभरा डाळ - १ वाटी
  • दही - १ वाटी
  • फोडणीचे साहित्य - तेल, हिंग, हळद, मोहोरी, मिरच्या इ.
१० मिनिटे
३-४ जण

हरबरा डाळ ४-५ तास भिजवून घ्यावी. भिजलेली डाळ थोडावेळ उपसून ठेवावी व नंतर मिक्सर मध्ये एक मिरची सहित बारीक वाटून घ्यावी. त्यात दही, मीठ मिसळावे. वरून तेलाची मिरच्यांचे तुकडे आणि किंचीत हळद  घालून खमंग फोडणी द्यावी. नीट ढवळून (हवे असल्यास अथवा दही घट्ट असल्यास अर्धा कप पाणी घालावे), कोथिंबीर भुरभुरावी व फ्रीज मध्ये ठेवून आयत्या वेळेस वाढावी.

पराठे, पोळी अथवा मसालेभाताबरोबरचे उत्तम तोंडीलावणे.  डावीकडची लज्जत वाढविणारी कोशिंबीर.

कढीपत्ता ऐच्छिक. तिखटपणा आवडीनुसार कमी जास्त करता येईल.