दहीवांगी

  • जांभळी वांगी - सहा (लहान आकाराची व उभी चिरुन)
  • तेल - वांगी तळण्यासाठी
  • दही - दोन कप
  • कांदा - एक बारीक चिरुन
  • तेल - फ़ोडणी साठी
  • जीरे व जीरेपुड
  • मोहरी व हिरव्या मिरच्या (तीन)
  • हिंग व कढिपत्ता
  • कोथिंबीर
  • चवीपुरते मीठ, चुटकीभर साखर
१० मिनिटे
चार व्यक्तींकरीता

प्रथम लहान  आकाराची सहा  वांगी धुवून घेऊन उभी चिरावी. कढईत तेल घेउन त्या वांग्याच्या उभ्या फोडी लालसर तळून घ्याव्या. पातेल्यात दही सारखे करून त्यात चवीपुरते मीठ, चुटकीभर साखर घालून घुसळवावे. त्यात तळलेल्या फोडी टाकून मिश्रण तयार करावे.फोडणी साठी कढईत तेल घेऊन, ते तापल्यावर मोहरी,हिरव्या मिरच्याचे तुकडे ,जीरे, हिंग व कढिपत्ते  व बारीक चिरलेला कांदा परतून तयार फोडणी पातेल्यातील मिश्रणावर घालावी. वर जीरेपुड घालून कोथिंबीर भिरभिरवावी.
तयार दहीवांगी  गरम पोळीबरोबर वाढावी.

टीप :: हिरव्या मिरच्याचे तुकडे वापरण्याऐवजी लाल तिखट हवे असल्यास ते सुरुवातीला दह्यातच घालवे.
माझ्या सासुबाई