तांदूळ आणि मिश्र डाळीचे धिरडे

  • तांदूळ
  • उडीद दाळ
  • मूग दाळ
  • हरबरा डाळ
  • लसूण
  • हळद
  • तिखट
  • जिरे
  • मीठ
  • तेल
१० मिनिटे
दहा जनाना अगदी पोटभर
  1. १ किलो तांदूळ,आणि  उडीद डाळ,मूग डाळ,व हरबरा डाळ (१ किलो )सम प्रमाणात साफ करून सर्व जिन्नस दळून आणावे 
  2. दळून आणलेले पीठ एका पातेल्यात घ्यावे 
  3. व त्यात लसूण बारीक करून टाकावे 
  4. हळद,तिखट,जिरे, मीठ,चवीनुसार टाकावे 
  5. गरजेनुसार पाणी टाका व 
  6. एकत्र पिठाचे मिश्रण गरम झालेल्या तव्यावर थोडे तेल लावून वाटीने पसरावे
  7. व बाजूने थोडे तेल सोडावे मस्त खरपूस धिरडे तयार.

सोबत दाळव्याची चटणी किंवा शेंगदाणा चटणी द्यावी

माझी सहेली स्मिता जागदे