गाईला देव मानावे का?

हिंदू धर्मात गाईला देवाचे स्थान दिलेले आहे.
गाय हा अनेक प्रकारे उपयोगी पडणारा प्राणी आहे ह्यात शंका नाही पण शेवटी तो एक पशू आहे. त्याला देवत्व देणे किती योग्य आहे?
सावरकरांनी या प्रथेविरुद्ध अनेक मार्मिक आणि बिनतोड लेख लिहिले आहेत पण त्यामुळे अनेक अनुयायी त्यांनी गमावले असे म्हणतात.
  आजच्या काळात ही गाईला देव मानण्याची भावना योग्य आहे का?
मला वाटते की ही संकल्पना कालबाह्य आहे. ती त्यागण्यातच हिंदू समाजाचे भले आहे.


आपल्याला काय वाटते?