कली

लहानपणी एका व्यक्तीची गोष्ट वाचली होती. बहुधा तो राजा होता. एकदा त्याने शौचाहून आल्यावर त्याने पाय पूर्ण धुतले नाहीत. टाचेचा भाग धुतला गेला नाही, तेथून कली त्याच्या शरीरात प्रवेश करता झाला. प्रवेश केल्यावर त्या राजाच्या शरीराची व पुढे जीवनाची त्या कलीने नासाडी केली.
१. आजच्या कलीयुगाशी या कलीचा संबंध आहे का?
२.या कथुलीकडे शास्त्रीय दृष्टीने कसे पाहता येईल?

३.कलीला शरीरात प्रवेश करण्यासाठी टाच वगळता इतर भाग वर्ज्य असतात का?