दारू आणि इंग्रजी

आपणा सर्वांना दारूचे प्रताप तर माहीतच असतील.दारुड्या माणसाची बडबड हि एक अतिशय विनोदी गोष्ट असते.  बऱ्याच चित्रपटांमध्ये हीरो दारू पिऊन काहीतरी विनोदी बडबड करतो. शिवाय मी तरी कित्येक लोकांना दारू पिऊन बडबड करताना ऐकलंय. पण सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे ति म्हणजे सर्वजण दारूची नशा झाल्यावर इंग्रजी बोलतात. माझा प्रश्न असा आहे की दारू प्यायल्यावर लोक इंग्रजी मध्ये का बोलू लागतात?

कृपया आपले मत मांडावे.