वारी आणि तरूण पिढी

सध्या वृत्तपत्रांमधून वारीत सहभागी झालेल्या तरूण पिढीची छायाचित्रे येत आहेत. यासंदर्भात काही प्रश्न मनात येत आहेत.
१. तरूणांमध्ये अध्यात्मभाव वाढीला लागला आहे का ? की, हे केवळ 'चला करून पाहू या' या सदरातील आहे ?

२. नेहमीच्या  धकाधकीच्या दिनक्रमातून थोडी उसंत म्हणून वारीत सहभाग घेतला जात आहे का?
३. वाहिन्यांवरून वारीच्या बातम्या दाखविण्यात येत असल्याने हे आकर्षण आहे का? 

     वाहिन्या नसत्या तर इतके आकर्षण तरूण पिढीमध्ये निर्माण झाले असते का?
४. वाहिन्यांवरील बातम्यांमुळे समाजातील अधिकाधिक अभिजन वर्ग यापुढे वारी करू लागेल, अशी शक्यता आहे का?