१४ न्यूज कॅरोलायना या दूरदर्शन चॅनलवर मी पाठवलेले ३ फोटो दाखवले. एक सूर्यास्ताचा फोटो आहे तर दुसरे दोन सूर्योदयाचे आहेत. सूर्यास्ताचा फोटो २६ मार्च २०१३ आणि सूर्योदयाचे अनुक्रमे २३ जून २०१३ आणि ३१ जुलै २०१३ या तारखेला काढलेले आहेत.
३१ जुलै रोजी काढलेला सूर्योदयाचा फोटो १४ न्यूज कॅरोलायना या वेबपेजवर आहे. खाली दुवा पहा.
पाठवलेले फोटो व दूरदर्शन वर दाखवलेल्या फोटोंची काही सेंकदाची घेतलेली विडिओ क्लिप इथे देत आहे.
३१ जुलै रोजी जो सूर्योदयाचा फोटो काढला तेव्हा तर आकाश ढगांनी भरलेले होते. पण काही वेळाने दोन ढगांच्या मधून सूर्याने खूपच छान दर्शन दिले आणि फोटो काढला आणि लगेचच तो १४ न्यूज कॅरोलायना चॅनलला पाठवला आणि दुसऱ्या दिवशी लगेच दाखवला होता.
२६ मार्च २०१३ चा सूर्यास्त
३१ जुलै२०१३ चा सूर्योदय
२३ जून २०१३ चा सूर्योदय
वेबपेज या पानावर उजव्या बाजूला खाली सूर्योदयाचा फोटो आहे.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.