'नास्तिक' ची त्रासदायक व्याख्या

      नुकतेच भारत सरकारने मदरशांना देऊ केलेल्या आर्थिक मदतीच्या पार्श्वभूमीवर मला आलेला  एक विरोप  वाचण्यासारखा आहे.त्याचे  शब्दशःभाषांतर खाली देत आहे. लेखक जॉन हॅरिसन आहे. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी ड्यूमाला संबोधून केलेल्या भाषणाचा अनुवादही  त्याच विषयाशी संबंधित असल्याने देत आहे.तोही एका विरोपाचाच अनुवाद आहे. 

जॉन हॅरिसन यांचा अनुभव :
नास्तिक या शब्दाची त्रासदायक (Uncomfortable) व्याख्या
 वस्तुस्थिती : यू.के.मध्ये इस्लाम हा सर्वात अधिक वेगाने वाढणारा धर्म आहे. हा प्रसंग लंडनमध्ये घडला आहे. मला तो आवडला कारण इस्लामनेही ज्याची नोंद घेतली नाही अशी अगदी विचित्र वळणाच्या कल्पनेवरील वाद दाखवणारी ही सत्य हकीकत आहे.
वाचल्यावर भीतीशिवाय आणखी काय वाटते ? आपणा सर्वांनाच या पृथ्वीवर रहाण्यासाठी काहीतरी मार्ग शोधायला हवा.
मुस्लिम लोक आपल्या स्वतंत्र शाळा (मदरसा? )काढतात तेव्हा त्यांची बालके आपला दृष्टिकोण कसा आत्मसात करतील व आपल्या समाजात मिसळून कशी राहू शकतील याविषयी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे.
      मागील महिन्यात माझ्या तुरुंगातील नोकरीतील वार्षिक प्रशिक्षण वर्गास मी उपस्थित होतो. रोमन कॅथॉलिक,प्रॉटेस्टंट व मुस्लिम अशा तीन धर्माच्या प्रतिनिधीनी आपल्या धर्मश्रद्धांविषयी विवरण केले.मुस्लिम इमामाने जी त्यांच्या धर्माची मूलतत्वे दृक्माध्यमाचा आधार घेऊन सांगितली त्याने माझे चित्त अधिक वेधले गेले. त्यांच्या त्या विवरणानंतर प्रश्नोत्तराच्या काळात मी इमामना विचारले,"माझी काही चुकीची समजूत झाली असेल तर त्यात दुरुस्ती करा पण माझा असा समज झाला आहे की सर्व इमाम व मुस्लिम धर्मगुरूंनी नास्तिकाविरुद्ध युद्ध पुकारले आहे.सर्व जगातील नास्तिकांविरुद्ध युद्ध आणि तेही सर्व नास्तिकांना ठार मारण्यासाठी (अशी सर्व मुस्लिमांना धर्माज्ञाच आहे) आणि तसे केल्यास त्यांचे स्वर्गातील स्थान निश्चित ठेवलेलेच आहे.असे असेल तर कृपया मला ’नास्तिक’ या शब्दाची आपली व्याख्या काय आहे हे कळेल का?"
    माझ्या विधानाशी कोठल्याही प्रकारची असहमती न दर्शवता त्यानी उत्तर दिले ,"म्हणजे ज्याचा विश्वास नाही तो  'Non-believers!'
 यावर मी म्हणालो,"याचा निश्चितपणे सरळ अर्थ असा निघतो की अल्लाचे जे अनुयायी आहेत त्याना स्वर्गात प्रवेश पाहिजे असेल तर अल्लावर ज्यांचा विश्वास नाही त्या सर्वांना ठार मारण्याची धर्माज्ञा आहे  ,बरोबर असेच ना?"
 आतापर्यंत अधिकारदर्शक भाव चेहऱ्यावर असणाऱ्या त्या इमामाचा चेहरा एकदम एकाद्या चोरून बिस्कीट घेण्यासाठी डब्यात हात घालताना पकडल्या गेलेल्या मुलासारखा दिसू लागला. आभि पडलेल्या आवाजात तो म्हणाला,"होय"
  मग मी म्हणालो," अच्छा ! तर मग मला खरा प्रश्न पडतो की पोप बेनेडिक्ट यांनी सर्व कॅथॉलिकांना सर्व मुस्लिमांना मारण्याची अथवा कॅन्टर्बरीच्या आर्चबिशपनी सर्व प्रॉटेस्टंटांना तशीच आज्ञा केली तर ?"
यावर इमाम चुप राहिला. मी पुढे बोलू लागलो,"मग मला पुढे असाही प्रश्न पडतो की तुम्ही व तुमचे बंधू धर्मगुरू आपल्या अनुयायांना मला मारण्यास सांगणार असाल तर मला तुमचा मित्र कसे रहाता येईल? मग तुम्ही स्वर्गात जावे म्हणून मला मारण्यास सांगणारा अल्ला किंवा मला स्वर्गात स्थान मिळावे म्हणून तुमच्यावर प्रेम करावे असे सांगणारा आणि माझ्याबरोबर तुम्हालाही स्वर्गात पहाण्याची इच्छा करणार येशू या दोन्हीपैकी तुम्हास कोण योग्य वाटतो?" त्यावर टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरली. त्या परिषदेच्या पुरस्कर्त्यांना अर्थातच मुस्लिम श्रद्धेतील हे सत्य उघडकीस आणणे पसंत पडले नाही.
वीस वर्षाच्या आतच म्ह.२०३१ पर्यंत ब्रिटन मधील मुस्लिम मतदारांची संख्या त्यांच्या पसंतीचे शासन आणुन शरिया प्रमाणे कारभार चालवण्याउतकी वाढणार आहे.
 जॉन हॅरिसन MBE. MIDSc
---------------------------
    याचबरोबर ४ फेब्रुआरी २०१३ या दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यानी ड्यूमा (रशियन लोकसभा) मध्ये रशियातील अल्पसंख्यांकांमुळे निर्माण होणाऱ्या तणावांविषयी भाषण देताना काय म्हटले हे वाचण्यासारखे आहे.
"रशियामध्ये  (रहायचे असेल तर) रशियन म्हणूनच रहा. कोणताही आणि कोठलाही अल्पसंख्य रशियात राहू , काम करू व पोट भरू इच्छित असेल तर त्याने रशियनच बोलले पाहिजे व रशियन कायद्याचेच बंधन पाळले पाहिजे.त्याना शरिया कायदा हवा असेल तर त्याना आम्ही सल्ला देऊ इच्छितो की तो कायदा ज्या देशात  असेल  तेथे  त्यानी  जावे, रशियाला अल्पसंख्यांकाची जरुरी नाही, अल्पसंख्यांकांना रशियाची जरुरी आहे आणि आम्ही त्यांना विशेष कोणतेही हक्क देऊ करणार नाही. किंवा त्यांया इच्छेप्रमाणे आमच्या कायद्यात बदल करणार नाही त्यानी खुशाल "सापत्नभाव सापत्नभाव" अशी ओरड करावी.
  अमेरिका. इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स या देशांच्या आत्मघातकी धोरणापासून (येथे त्यानी  suicides हाच शब्द वापरला आहे) आम्हाला देश
म्हणून टिकायचे असेल तर हा धडा घेतला पाहिजे. रशियन संस्कृती व परंपरा बहुतांश अल्पसंख्यकांच्या संस्कृतिहीन व
जंगली  परंपरांहून अगदी वेगळ्या आहे ,त‍ेव्हां हे आदरणीय कायदेमंडळ नवीन कायदे तयार करण्याचा विचार करते त्यावेळी  अल्पसंख्यांक हे रशियन नाहीत असे समजून प्रथम देशहिताचाच विचार करणे आवश्यक आहे."
ड्यूमामधील सर्व राजकारण्यांनी  उभे राहून पाच मिनिटे पुतीन यांना गौरविले.( standing ovation)
असेच विचार फ्रान्सच्या अध्यक्षांनीही व्यक्त केले होते. तेथे बुरख्यावर बंदी आहे.