नोकरी की धंदा ? शिक्षण तुम्हाला काय देऊ शकते ?

सध्या माझ्या घराचे बांधकाम चालू आहे.मी बऱ्याच ठेकेदारा मार्फत  काम करून घेतले.उदा. टाइल बसवणारे लोक UP मधून आलेले आहेत. त्यांचा ठेकेदार साधारण १७ वर्ष पुण्यात आहे. सुरवातीला बिगारी काम करून ३-४ वर्षातच ठेकेदारी करू लागला. शिवाय तिकडून येथे मजुरी काम करायला येणारे लोक बरेच असल्यामुळे त्यांना मजूर मिळवायला विशेष अडचण येत नाही. काही लोक जे इथे ३० -३५  वर्ष आहेत त्यांनी तर इतकी संपत्ती साठवून ठेवली आहे की आपण सामान्य माणसं फक्त कल्पनाच करू शकतो.

या वरून मला पडलेले काही प्रश्न.
सध्या अधिक पैसा कशात आहे ? नोकरी की धंदा ?
शिवाय आज शिकून सुद्धा लोक इतके पैसे मिळवू शकत नाही जेवढे पैसे हे लोक थोडा जम बसल्यावर सहज मिळवू शकतात.
मग शिक्षणाचा फक्त Investment  म्हणून विचार  केला.तर आज शिक्षण माणसाला किती पैसा मिळवून देऊ शकते ?

आज माझे असे बरेच मित्र आहेत जे ५ वर्ष कष्ट करून देखील पुरेसा पैसा मिळवू शकत नाहीयेत जेणेकरून ते स्वतःच घर घेऊ शकतील. आणि शिक्षण  नोकरी शिवाय दुसरा पर्याय देत नाहीये.

शिक्षण तुम्हाला काय देऊ शकते,जर प्रगती फक्त पैशातच मोजल्या जात असेल तर  ?