बीएमएम २०१५: बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (लोगो आणि स्लोगन)

मंडळी,  
कुठल्याही संस्थेचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणजे संस्थेचा अभिमान, तिचा इतिहास आणि कर्तृत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी. पुढच्या पिढीला संदेश आणि दिशा द्यायची संधी.  
Dan Brown च्या दा विन्ची कोड पासून शिवाजी महाराजांच्या छत्रपती मुद्रेपर्यंत आणि रेड क्रॉस च्या चिन्हापासून हिटलरच्या स्वस्तिकापर्यंत आतापर्यंत आपण अनेक बोधचिन्हे पाहिली.  
जय जवान जय किसान, गर्जा जयजयकार क्रांतीचा या घोषवाक्यांनी आपण देशभक्ती साठी प्रेरित झालो आणि सागरा प्राण तळमळला सारख्या काव्यांनी आपण हळवे झालो.  
आपल्याला असेच बोधचिन्ह आणि घोषवाक्य आपल्या लॉस एंजिलीस मधील २०१५ मधील अधिवेशनासाठी तयार करायचे आहे.  
यासाठी आम्ही बोधचिन्ह आणि घोषवाक्य अशा दोन स्पर्धा आयोजित  करीत आहोत.
अधिवेशनासाठी मैत्र पिढ्यांचे ही थीम ठरवण्यात आली आहे.  बोधचिन्ह आणि घोषवाक्य या दोन्ही स्पर्धा याच थीम वर आधारित असतील.   
स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला खालील पत्त्यावर ईमेल कराः
स्पर्धेची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१४ आहे.
विजेत्यांना योग्य पारितोषिक देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम आणि अधिक माहितीसाठी येथे पहाः