मुजरे

केलेत काळाने मला मुजरे कधी
होते दिवस माझ्या पुढे हुजरे कधी

खाली नजर,उडता पदर,गाली खळी
रोखायचे रस्ता कुणी बुजरे कधी

वाटेत काटे दगड काचा केवढ्या
ना आठवे पण पाय हे सुजरे कधी

वेळी अवेळी यायची तेंव्हा सुखे
भेटी विना नाही कुणी गुजरे कधी