केवळ सदिच्छा हे धोरण असू शकत नाही : लोकसत्ता

प्रजासत्ताकदिनाचा लोकसत्तेचा अग्रलेख :

प्रजासत्ताक : पोरकं आणि पोरकट

हा मुळातूनच वाचण्यासारखा लेख आहे.

त्यातला काही विचार करण्यासारखा वाटलेला भाग :

... केवळ सदिच्छा हे काही धोरण असू शकत नाही. म्हणजे केवळ चांगलं काही करायची इच्छा आहे म्हणून काही चांगलंच होईल असं मानायची गरज नाही. म्हणजे केवळ एखाद्याचा वैताग आलाय म्हणून ज्याप्रमाणे परिस्थिती बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे  नुसत्या सदिच्छेने काहीही होत नाही. सदिच्छेला दिशा लागते. धोरण लागतं. आणि त्याप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा लागते. या तिन्ही घटकांशिवाय कोणालाही- मग ती व्यक्ती असो वा व्यवस्था- यश मिळूच शकत नाही. आणि समजा- योगायोगाने ते मिळालंच, तर ते फक्त आणि फक्त तात्कालिकच असतं. हा व्यवस्थेच्या भौतिकशास्त्राचा नियम आहे. ..

... राजस आणि सालस दोघेही नियमांना अपवाद. .

... आणि खरं तर साधेपणा म्हणजे काय?

... मुद्दा असा, की एखादा साधा आहे, सभ्य आहे, हे वेगळं सांगायला का लागतं? कोणाही व्यक्तीकडे- मग ती उच्चपदस्थ असो वा नसो- हे किमान गुण असायलाच हवेत. त्यात विशेष ते काय?

... पण आपल्या समाजात हे गुण विशेष मानले जातात, हेच आपलं मोठं सामाजिक अपंगत्व आहे. याचा परिणाम.. खरं तर दुष्परिणाम- असा की, अन्य काही गुण असोत वा नसोत, केवळ प्रामाणिकपणा, सभ्यता वगैरेंवरच एखाद्याला मोठं मानलं जातं. ...

... ह्या प्रश्नाचं उत्तर फार महत्त्वाचं आहे. कारण त्यावर आपलं सामाजिक वय ठरणार आहे.

तुम्हाला काय वाटते?