मुलं परदेशात गेल्यावर आईबाबांच्या म्हातारपणाची जवाबदारी कुणाची?

म्हातारे आई बाप, मित्र, जुने लागे -बांधे सगळं आहे तिथे सोडून पोरं परदेशी होतात आणि कुटुंब या संस्थेला हादरे बसायला लागतात.... मनोगतींमध्ये सगळ्याच वयाची माणसं असतील कदाचित म्हणून ही चर्चा.....

१.मुलं दूर गेल्यावर आईबाबांच्या म्हातारपणाची जवाबदारी कुणाची? फक्त पैसे पाठवले की सगळे होते का? शेवट जवळ आला असताना पोरंबाळं जवळ असावी हे  (भारतीय) वाटणं चुकीचं आहे का? की इथून पुढे मुलं जन्माला घालायची, शिकवायची आणि द्यायची अमेरिकेला धाडून, काही आशा न ठेवता ? 

२. ही मुलं आपल्या पालकांना सोबत देखील नेत नाहीत... का तर परदेशात मेडीकल खर्च झेपणारा नसतो.... तिथल्या सारखं कमवता येतं पण खर्च करताना भरतीय काटकसर आडवी येते... 
३. पालकांच्या आवडीनावडी चा विचार न करता त्यांना बाळंतपणासाठी, आपल्या अडचणींसाठी मात्र हक्कानी नेल्या जाते.. नोकर चाकर नसलेल्या आपल्या मुलांच्या संसारात, नव्या वतावरणाशी,उपकरणांशी जुळवतांना दम निघतो बिचाऱ्यांचा... मुलांसाठी सगळं करतातही बरेच जण. पण आईबाबांच्या आजारपणावेळी मात्र नेमके मुलांचे प्रोजेक्ट मध्ये येतात.... विमानाची तिकिटं मिळत नाहीत..

४. लग्न, मुलं या पासून नवी पिढी या मुळेच दूर पळत असेल का ? लग्न ही नको आणि  जवाबदारी ही नको.

काय चूक काय बरोबर गुंता आहे सगळा...आपले विचार कळवावे....