अप्रुपं

अप्रुपं

पायातले पैंजण
मनातले गुंजन
नेत्रातलं अंजन
अमावास्येचं चांदणं

कर्णफुलाचा झोका
हृदयिचा ठेका
केसांची बट
लावी जिवाची वाट

वाऱ्यावरती ओढणी
फेडते डोळ्यांची पारणी
अस्पुटसा हुंकार
करी जीव बेजार

नाजुक काया
जणू सुगंधी फाया
तुझे अलवार चालणे
धरित्रीने फुलास झेलणे

काय वर्णू तुझे रुपं
निसर्गालाही अप्रुपं

राजेंद्र देवी