आधीच

आधीच सारे जाणते ती
काळीज माझे वाचते ती

हर एक रात्री पूर्णिमा ये
चंद्रास पदरी राखते ती

आभूषणांना नवल वाटे
साध्या फुलांनी साजते ती

देही मनी वरदळ वसंती
बहरात कायम राहते ती

हरवून जाता सूर माझा
शोधून बंसी आणते ती

त्या ईश्वराला त्रास नाही
काही कधी ना मागते ती

...

जयन्ता५२