घाव कधीही

दुनियेला मी दावत नाही घाव कधीही
आणत नाही खोटा खोटा आव कधीही

माणुस मिळतो स्वस्तामध्धे, महाग वस्तू
राजकारणी कोठे बघतो भाव कधीही

किती असावी खोल मनाची जखम,दिलेली

मला न घेता आला याचा ठाव कधीही
प्रेम ,भावना ,मदत ,ऐकता, आपुलकी पण,
मला न दिसले स्वप्नांमधले गाव कधीही
नावानंतर तिच्या कुणाचे नाव असू दे 
ना विसरावे तिने न माझे नाव कधीही
                        ---स्नेहदर्शन