आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप

नमस्कार मंडळी.

सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोपं व्हावं म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)"
नावाचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप तयार केले आहे. Google Play वर आपण हे अ‍ॅप या लिंक वर डाउनलोड करू शकता दुवा क्र. १

हे अ‍ॅप वापरण्यासाठी एकदम
सोपे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न
केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अ‍ॅप निःशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध
आहे.

कित्येक वेळा आरत्या म्हणताना चुकतात किंवा आपल्याला शब्द आठवत नाहीत.
अश्या वेळी, "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅप जरूर उपयोगी पडेल अशी प्रामाणिक
अपेक्षा आहे.

या अ‍ॅपची ओळख करून देणारी एक चित्रफीत YouTube वर उपलब्ध आहे. दुवा क्र. २ जरूर पहा आणि प्रतिक्रिया नोंदवा.

मी आणि माझे या उपक्रमातील साथीदार आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ऐकण्यास उत्सुक आहोत.