सायबर कॅफेत एक दिवस

सायबर कॅफेत एक दिवस
पात्र परिचय
शेखर - सायबर कॅफेचा मालक
रश्मी - शेखरची पत्नी
नेहा  - शेखरची सहायक

"रश्मी, अगं आई आजारी आहे आणि तिला हॉस्पिटल मध्ये  दाखल केलंय. मला गावाला जावं लागेल. तू मात्र ईथेच थांब. आणि सात-आठ दिवस तुला कॅफे सांभाळावा लागेल" शेखरच्या मनावरचा ताण आवाजात  जाणवत होता.
"पण मी कॅफे कसा संभाळणार? मला तर काहीच माहित नाही... "
"रश्मी, तुला शिकावं लागेल. मी उद्या निघेन, आजचा दिवस तुला सगळं काही शिकवेन. संध्याकाळी तर नेहा असते आणि ती नीट सांभाळते कॅफे पण सकाळी तुला एकटीलाच बघावं लागेल. कॅफे हे माझ्या कमाईचं एकमेव साधन आहे आणि त्यामुळे तो बंद ठेवणं मला परवडणार नाही"

शेखर २८ वर्षांचा होतकरु तरुण. कॉम्पुटरचा डिप्लोमा केल्यावर काही काळाने "खूप काम आणि कमी पैसा" असं समीकरण असलेल्या नोकरीला रामराम ठोकत त्याने स्वतःचा सायबर कॅफे चालू केला. शेखर चा सायबर कॅफे विशेष लोकप्रिय होता. अद्ययावत कॉम्प्युटर्स, ईंटरनेटचे चांगले कनेक्शन, उत्तम आसनव्यवस्था, कॉम्प्युटर गेम्स साठी विशेष सुविधा, प्रिंटींग व स्कॅनिंगच्या सुविधा तसेच अल्प दर यामुळे जास्तीत जास्त लोक याच कॅफेकडे वळायचे. सकाळी पाच तास आणि सायंकाळि पाच तास असा दहा तास कॅफे चालू असायचा. त्यापैकी संध्याकाळि जास्त गर्दी असल्याने शेखरने यावेळेकरीता नेहा नावाच्या तरुणीस सहायक म्हणून ठेवले होते.

नेहा हुषार आणि तरतरीत होती. सहा महिन्यांपासून ती कॅफेत कामाला होती. तिथे रुजू झाल्यावर चार पाच दिवसातच ती सगळं काम शिकली. मेहनती नेहाचं वागणं मात्र शेखर ला कधी कधी आवडत नसे. ती लगट करायचा प्रयत्न करते असं त्याला वाटे. ती वयाने बरीच लहान म्हणजे २०-२१ वर्षांंची होती. त्यामुळे तिच्या थोड्याश्या विचित्र वागण्याकडे "तिच्या वयाचा परिणाम" असा विचार करत शेखर दुर्लक्ष करत असे. शिवाय दुसरा कुणी चांगला सहायक मिळणे ही सोपे नव्हतेच.

तीन महिन्यांपुर्वी शेखर चे रश्मीशी लग्न झाले होते. २५ वर्षांची रश्मी पदवीधर असली तरी व्यहवारात फारशी हुशार आणि बोलण्या वागण्यात फारशी तरतरीत नव्हती. पण सुंदर, मनमिळावू, घर नीट सांभाळणारी आणि मुख्य म्हणजे शेखरवर मनापासून प्रेम करणारी असल्याने शेखरचे ही तिच्यावर खूप प्रेम होते.

सकाळी रश्मी शेखर बरोबर कॅफेमध्ये आली. शेखरने तिला सगळी उपकरणे व्यवस्थित दाखवली, त्यांची माहिती दिली. कॅफेमध्ये असलेल्या १२ कॉम्प्युटर पैकी ११ छोट्या क्युबिकल मध्ये होते तर एका कॉम्प्युटर साठी खास मोठी केबिन होती. शेखर या केबिन मध्ये बसून काम करी. या केबिनमध्येच विडीओ चॅटिंगसाठी लागणाऱ्या सुविधा होत्या. केबिनचे दार लावले तर केबिन बऱ्यापैकी साउंडप्रुफ होत असे. त्यामुळे विडीओ चॅटद्वारे नोकरीची मुलाकात देणाऱ्यांस शेखर ह्या केबिन मध्ये जास्त दराने बसायला देई.

शेखरने विविध उपकरणे कशी चालू करायची, कशी वापरायची, कॅफेमधल्या इतर बाबी रश्मीला समजावल्या. पण रश्मीकरिता हे सगळेच खूप नवीन होते. शिवाय शेखर अगदी उत्तम शिक्षक होता असेही नाही त्यामुळे तिला बऱ्याचशा गोष्टी नीट समजल्या नाहीत आणि कॅफे सांभाळण्याचा आत्मविश्वासही तिला वाटला नाही. त्यामुळे शेखर विचारात पडला.

सायंकाळी नेहा आली. शेखरने दोघींची ओळख करुन दिली.
"हाय रश्मी, कशी आहेस? शेखर अरे तीन महिने झाले तुझ्या लग्नाला आणि तु आज भेटवतो आहेस तुझ्या बायकोला... "रश्मीला न्याहाळत नेहाने विचारले. रश्मीला नेहाची नजर काहीशी विचित्र वाटली शिवाय शेखरला सर किंवा निदान दादा वगैरे न म्हणता थेट नावाने हाक मारते हे तिला फारसं पटंल नाही. पण नंतर तिने तो विचार झटकून टाकला.
शेखर नंतर नेहाला म्हणाला "नेहा, मी सात-आठ दिवसांकरिता गावाला चाललोय. मी रश्मी ला कॅफेचे काम समजावले आहे पण लगेच तिला एकटीला कॅफे सांभाळता येणं कठीण आहे. आणि तुझ्या कॉलेजला पण सुटी आहे सध्या, तर तु तीन-चार दिवस सकाळी देखील येवू शकतेस का? "
"अर्थातच शेखर, विचारतोस काय? हुकुम करो मेरे आका... तुम बुलाओ और हम ना आये? एनिथिंग फॉर यू शेखर... " नेहा हसत उत्तरली.
शेखर पण हसला आणि रश्मीला हसावं लागलं

x-------------------------x

पुढच्या दिवशी शेखर गावी निघून गेला. रश्मी सकाळी नऊ वाजता कॅफेजवळ आली. नेहा तिथे आधीच हजर होती. तिने लाल रंगाचा टी शर्ट, जीन्स आणि शूज घातले होते तसेच केस मोकळे सोडले होते. अशा पेहरावात ती आकर्षक आणि रुबाबदार दिसत होती. तर रश्मीने साधासा चुडीदार घातला होता, त्याला इस्त्री पण केलेली नव्हती. एकूणातच अतिशय साधेपणामुळे रश्मी सुंदर असूनही फिकी दिसत होती.

"यू आर लेट रश्मी. अगं ८ः४० च्या आधी कॅफे उघडावा लागतो.   माझ्याकडे चावी असती तर मी तरी उघडला असता"
"ओ.. सॉरी. अगं थोडा उशीरच झाला, पण कस्टमर येवून निघून गेलेत की काय? " रश्मीने गडबडून विचारले.
"कस्टमर्स नाही आलेत अजून पण कामवाली बाई वाट पाहून निघून गेली. ती झाडू मारायला आणी फरशी पुसायला येत असते"
"अरेरे.... मग आता गं? "रश्मी अजूनच गोंधळली.
"अगं आता प्रश्न विचारत बसू नकोस. आधी कॅफे उघड आणि झाडून व फरशी पुसून घे" नेहा टोकदार आवाजात म्हणाली.
"हो... उघडते हं"
रश्मीने कॅफे उघडला आणि चपला बाहेर काढून ती आत गेली. शेखर चा नियमच होता तसा "कॅफेमध्ये कुणीच चपला बूट घालून जायचे नाही".
पण रश्मीच्या मागे नेहा बूट न काढताच आत येवू लागली.
"अगं नेहा, कॅफे मध्ये बूट घालून नाही ना जात? " रश्मीने विचारले.
"माहीत आहे गं मला. पण अजून तुझं झाडून पुसून व्हायचं आहे तर मी कशाला माझे पाय खराब करु? " नेहा तोऱ्यात म्हणाली.

रश्मीने काही उत्तर दिले नाही.   कोपऱ्यातला झाडू घेउन ती कॅफे झाडू लागली. ती झाडत असताना नेहा कॉम्प्युटर्स, राउटर, मॉडेम ई. चालू करण्यासाठी इकडून तिकडे फिरत होती. त्यामुळे अनेकदा रश्मीला झाडताना थांबवे लागले.
"झाडून झालं ना? आता कोपऱ्यातली बादली घे, बाहेर नळावरुन पाणी आण आणि फरशी पुसून काढ. चल लवकर कर, कस्टमर्स येतील आता" नेहा म्हणाली.
"हो घेते. " म्हणत रश्मी कामाला लागली.
ती फरशी पुसत असताना नेहाचे इकडुन तिकडे जाणे चालू होतेच. तीन चार वेळा पुसून झालेल्या भागावर तिच्या बूटांचे ठसे उमटले आणि रश्मीला तिथे पुन्हा पुसावे लागले.
"रश्मी, इकडे ये" नेहा आता केबिन मध्ये बसली होती.
"हो. आले" म्हणत रश्मी आत केबिन मध्ये गेली.
"झाली ना फरशी पुसून? "
"हो झाली"
"मग माझे शूज आता बाहेर ठेवून दे" पायातले बूट काढत नेहा म्हणाली.
रश्मीला हे विचित्र वाटले. अगदी शेखर देखील तिला अशी कामं सांगत नसे पण इथे तर २०-२१ वर्षांची तरूणी, तिच्या नवऱ्याची सहायक म्हणजे एका अर्थाने त्याने कामाला ठेवलेली नोकराणी तिला म्हणजे मालकिणीला बूट उचलून ठेवायला सांगत होती.
"अगं बघतेस काय? कळलं नाही का? बूट उचलून बाहेर ठेव, जा" नेहाचा आवाज किंचीत चढला होता.
"हो ठेवते" बूट उचलून घेत रश्मी म्हणाली. रश्मीला नाही म्हणता नाही आलं. शिवाय नेहाच्या चढ्या आवाजाने ती गोंधळुन गेली.

नेहा रश्मी ला मुद्दामच अपमानकारक पध्द्तीने वागवत होती. कॅफेत नोकरीला लागल्यानंतर थोडेच दिवसात शेखर नेहाच्या मनात भरला होता. त्याचे देखणेपण, त्याची हुशारी, धडाडी, व्यवसायकौशल्य यांवर ती भाळली होती. तो आपल्या आयुष्यात यावा अशी स्वप्नं ती बघू लागली. पण शेखरला तिचे मन कळाले नव्हते किंवा त्याने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. एकदा परीक्षेकरिता तिने कॅफेच्या कामातून पंधरा दिवस सुटी घेतली, सुटीनंतर परत आल्यावर शेखरने तिला त्याच्या लग्नाची गोड बातमी आणि मिठाई दिली. नेहा दुखावली गेली होती. पण शेखर तिला मनापासून आवडायचा त्यामुळे तिने नोकरी सोडली नाही. शेखरशी जवळीक करायचा प्रयत्न ती करायची पण त्याने तिला कधी प्रतिसाद दिला नाही.
आज रश्मी नेहाच्या समोर होती. आपल्याला हवे असलेले स्थान रश्मीला मिळाले म्हणून नेहाचा रश्मीवर राग होता. त्यामुळे "मी कशी स्मार्ट आहे, व तू कशी अडाणी आणि बावळट आहेस" हे रश्मीला वागण्यातून दाखवून द्यायचे असे नेहाने ठरवले होते. त्यात रश्मीचा भिडस्त स्वभाव नेहा च्या पथ्यावरच पडला.

बूट ठेवून आल्यावर रश्मी केबिनमध्ये बसली.
अचानक प्लास्टिकची रिकामी बाटली तिच्या अंगावर आली. दचकून कशीबशी तिने बाटली सांभाळली.
"ही बॉटल घे आणि पिण्याचं पाणी आण बाहेरुन. अजून तीन चार बॉटल्स आहे बाजूला त्या पण भर" नेहा म्हणाली
"अं.. हो. " रश्मी गोंधळून म्हणाली.
"हो काय? उठ लवकर. जा. " नेहाने फर्मावले.
काही न बोलता रश्मी उठली.

आता ग्राहक येवू लागले होते. नेहाने रश्मीला ग्राहकांचे ओळखपत्र तपासणे, त्यांचे कॅफेच्या सॉफ्टवेअर मध्ये खाते आहे का ते तपासणे, नसल्यास बनवणे, त्यांची माहिती भरणे ई बद्दल सूचना दिल्यात. तरी प्रत्येक ग्राहक आल्यावर रश्मी गोंधळून जात होती आणि नेहाला शंका विचारत होती.
मग नेहाने बजावले "आता मी तुला सगळ्या स्टेप्स पुन्हा एकदा सांगते, नीट लिहून घे आणि त्या प्रमाणे कर"
"हो सांग"
नेहा मुद्दामच वेगाने सांगत होती आणि कागदावर उतरवून घेताना रश्मीची धांदल उडत होती.
एक दोनदा रश्मी म्हणाली "अगं जरा हळू सांग ना प्लीज.. "
"काय गं? नवीनच साक्षर झाली आहेस का तू? " असं म्हणत नेहाने तिचा अपमान केला.
त्यानंतरही नेहा पुन्हा पुन्हा रश्मीचा अपमान करत होतीच
"अगं इतकं कळत नाही का तुला? एवढंसं काम करायला इतका वेळ लागतो का? चार वेळा सांगून पण समजत नाही का? मंद आहेस का जरा? " असे अनेक अपमानकारक प्रश्न रश्मी सहन करत होती.
"तसेच तीन नंबरचा फॅन लाव, मागची लाईट बंद कर, मला पाण्याची बॉटल दे" ई आज्ञांचे पण ती विनातक्रार पालन करीत होती.

मुळात रश्मी स्वभावाने गरीब होती. कुणाला उलटून बोलणं वा कुणावर रागावणं तिला जमत नसे. शिवाय नेहाला काही बोलल तर ती निघून जाईल आणि मग आपल्याला एकटीला कॅफे सांभाळता येणार नाही, ग्राहक परत गेले तर धंदा बुडेल या भीतीने रश्मी तिला काही बोलत नव्हती. पण मनोमन ती उदास होती.
शेवटी तिने कशीबशी स्वतःची समजूत घातली कि "माझी एखादी हट्टी, लाडावलेली लहान बहीण असती तर तिचे नखरे देखील प्रेमाने सहन केलेच असते. मग नेहा पण माझ्या धाकट्या बहिणी सारखीच आहे"

रश्मी विचारात गुंतली असताना एक ग्राहक केबिनजवळ आला.
"अहो माझ्या कॉम्प्युटर वर कनेक्शन येत नाही, जर बघा ना… "
"जा गं सहा नंबरला बघ काय झालंय ते" नेहाने हुकूम सोडला
"चला बघते मी म्हणत" रश्मी लगबगीने उठली 
तिने त्या कॉम्प्युटर वर काही तपासण्याचा प्रयत्न केला. पण अर्थातच तिला काही कळले नाही.
"नेहा प्लीज जरा इकडे येतेस का? मला नाही समजत  काय झालंय ते" रश्मीने नेहाला आवाज दिला
पण नेहाने ऐकून न ऐकल्यासारखे केले
रश्मीने अजून एकदा मोठ्याने हाक मारून पाहिली पण पुन्हा काहीच उत्तर आले नाही.
शेवटी रश्मी केबिनपाशी येवून म्हणाली "अगं नेहा प्लीज जरा येतेस का? मला नाही समजत काय प्रॉब्लेम आहे ते"
"हं… वाटलंच मला. तुला काही येतच नाही. चला. आता मलाच बघावे लागेल. " भाव खात नेहा उठली आणि कॉम्प्यूटर पाशी गेली.
एक दोन मिनिटे काही गोष्टी तपासून  करून नेहा म्हणाली "हं पॅच कॉर्ड खराब झाली आहे. रश्मी एक पॅच कॉर्ड घे"
"पॅच कॉर्ड … म्हणजे? " रश्मी गोंधळून म्हणाली
"ओफ ओ... अग लॅन ची केबल. तिथे रॅकवर आहे. चल आण लवकर" नेहा वैतागून म्हणाली.
रश्मी रॅकपाशी गेली, तिथे अनेक केबल्स पडल्या होत्या. कोणती घ्यावी ते न समजल्याने तिने एक अंदाजाने केबल उचलली आणि नेहा कडे दिली.
"अगं मूर्ख आहेस का तू? तुला लॅन ची केबल आणायला सांगितली आणि तू पॉवर केबल घेवून आलीस" नेहा भडकून म्हणाली
"सॉरी, अगं पण मला नाही समजत.. " रश्मी घाबरलेल्या आवाजात म्हणाली
"हे बघं .. ही अशी.. " नेहाचा स्वर अजून उंच होता. जुनी खराब पॅच कॉर्ड काढुन हातात घेत तिने रश्मीला दाखवली.
रश्मी रॅकपाशी गेली आणि तिने काळजीपुर्वक पॅच कॉर्ड उचलली.
"हं… आता तिचं एक टोक कॉम्प्युटरला आणि एक राऊटरला असं लाव" नेहाच्या आवाजात वैताग आणि जरब यांचं मिश्रण होतं.
कॉम्प्युटरला पॅच कॉर्ड जोडण्यासाठी रश्मी खाली वाकली. पण ती कशी जोडावी ते तिला समजले नाही. आणि नेहाला काही विचारायचे धाडसही तिला होत नव्हते म्हणून ती उगाच काहीतरी खटपट करत राहिली.
दोन-तीन मिनटे गेल्यावर तिच्या डोक्यावर एक टप्पल पडली.
"काय करते आहेस? कॉर्ड लावता येत नाही का? किती वेळची खेळत आहेस? " नेहा ओरडून म्हणाली.
"नाही.. ते मी बघंतच होते... " रश्मी कशीबशी उत्तरली.
"नाही येत तर सांगायचं ना.. इथे कस्टमर चा वेळ वाया जातोय तुझ्यामुळे" नेहाने तिच्या हातातून कॉर्ड घेतली
"सॉरी.. " अपराधी वाटून रश्मी म्हणाली.
कॉर्ड लावून, कनेक्शन ठीक असल्याची खात्री झाल्यावर नेहा केबिनमध्ये जावून बसली.
पाठोपाठ रश्मी पण केबिनमध्ये जावून बसली.
दिवसभर सतत झालेल्या अपमानाने रश्मीचा जीव व्याकूळ झाला होता. काय करावे काहीच सुचत नव्हते. "आपल्याला काहिच येत नाही" असा न्युनगंड आणि अपराधीपणाचा भाव तिच्या मनात दाटून आला होता.
काही क्षण गेल्यावर मनावरचा ताण हलका करण्यासाठी ती कशीबशी म्हणाली "किती कठीण आहे ना हे? तुला बरं गं छान जमतं सगळं.. "
"हं. कठीण काय त्यात? डोकं ठिकाणावर ठेवून काम केलं की सगळं जमतं.. "
नेहाच्या फटकळ उत्तरामुळे रश्मी पुन्हा गप्प बसली. खाली मान घालून ओढणीशी काहीतरी चाळा करु लागली.
"उफ.. थकून गेले मी तर" असं म्हणत नेहाने जीन्सच्या खिशातून सिगारेटचे पाकिट व लायटर काढले.
तिने सिगरेट पेटवली तशी लाईटरच्या आवाजामुळे चमकून रश्मीने वर पाहिले.
"नेहा, तू... तू सिगरेट ओढतेस? " रश्मीने विचारले.
"हो, का? काय प्रॉब्लेम आहे? " एक झुरका घेवून धूर हवेत सोडत नेहाने गुर्मीत विचारले.
"अगं पण कॅफे मध्ये स्मोकिंग...? " रश्मीने अडखळत विचारले.
तशी नेहा उठून संथ पावलं टाकत रश्मी जवळ आली.
नेहाच्या देहबोलीतून आक्रमकता जाणवत होती. रश्मी गडबडून उभी राहिली.
नेहाने सिगरेट डाव्या हातात घेत उजवा हात पुढे केला आणि रश्मीचा कान पकडून थोडासा पिरगाळला.
"तुला कॉम्प्युटर चालू करायची अक्कल नाही... आणि तू मला जाब विचारतेस? " कान पिरगाळतच नेहाने विचारले.
नेहाच्या अनपेक्षित कृतीने रश्मी घाबरुन गेली, आपला हात कानाजवळ नेत तिने कान सोडवण्याचा प्रयत्न केला पण तिला ते जमले नाही.
"अगं जाब नाही विचारत मी" नजर खाली झुकवून रश्मी कशीबशी म्हणाली.
"हो का? मग काय करते आहेस? "
"असं काय करतेस अगं.. प्लीज कान सोड ना माझा.. " रश्मी रडवेल्या स्वरात म्हणाली.
"घे... सोडला.. "तिचा कान सोडत नेहा म्हणाली "बोल आता, काय म्हणायचंय तुला"
पण रश्मीला काही बोलायचं धाडस होत नव्हतं.
"अगं बोल ना.... बोल तरी"  नेहा ओरडली.
"हेच की कॅफेमध्ये स्मोकिंग ला परवानगी नाहिये ना.. म्हणजे शेखर ने अलाऊ नाही केलय ना कुणाला स्मोक करायला " रश्मी कशीबशी बोलली.
"हो का? तु मला शिकवणार का कॅफेमध्ये काय अलाऊड आहे आणि काय नाही ते... मालकिण नाही का तू... पण काय हो मालकिणबाई कॉम्प्युटर तरी चालू करता येतो का तुम्हाला? " नेहा उपहासाने म्हणाली.
"अगं असं काय करतेस? आता शिकत तर आहे ना मी " रश्मी काहीशी वैतागून म्हणाली.
"हे मात्र छान जमतं हं तुला... उलटून बोलायला... "
रश्मी आश्चर्याने नेहाकडे बघू लागली... तोच..
थाड... नेहाने रश्मीला एक जोरदार कानाखाली लगावली. रश्मी आता पुर्ण घाबरली. तिने आपला हात उचलून हुळहुळणाऱ्या गालावर ठेवला.
थाड... नेहाने दुसऱ्या गालावर जोरात थप्पड लगावली. या अनपेक्षित हल्ल्याने रश्मी भेदरली. तिने दोन्ही गाल हातांनी झाकून घेतले.
"हात खाली" नेहाने फर्मावले.
पण रश्मीने गालावर हात अधिकच घट्ट धरले.
"हात खाली घे म्हंटलं ना" नेहा ओरडून म्हणाली.
पण रश्मीने हात खाली घेतले नाहीत.
नेहा अजूनच फणफणली. तिने रश्मीचा हात खसकन खेचून बाजूला केला.
आणि तिला हाताने पुन्हा गाल झाकण्याची संधी न देता नेहाने तिला सटासट तीन-चार कानाखाली वाजवल्या. रश्मी आता रडू लागली.
"सॉरी.. " रश्मी रडतच कशीबशी म्हणाली.
"ओह... वॉव.. आता सुचतय का तुला सॉरी म्हणायचं.. अजून एकदा म्हण" म्हणत नेहाने अजून एक कानाखाली लगावली.
"सॉरी.. "
"वा वा.. छान वाटतंय ऐकायला... अजून एकदा.. " अजून थप्पड लगावत नेहा म्हणाली.
"सॉरी.. " हुंदके देत रश्मी म्हणाली.
"पण तू कुणाला सॉरी म्हणतेयस, टेबलाला, खुर्चिला की कॉम्प्युटरला? " म्हणत नेहाने रश्मी ला अजून एक काडकन कानाखाली वाजवली.
"सॉरी नेहा"
"ओह.. नेहा?? सकाळपासून तुला जीव तोडून शिकवतेय तर थोडा रिस्पेक्ट द्या की मला मालकीणबाई" रश्मीच्या हुळहुळणाऱ्या गालावरुन हात फिरवत नेहा म्हणाली.
"सॉरी... सॉरी मॅम... "
"हं.... आता कसं? चल अजून एकदा म्हण पाहू" पुन्हा एक काडकन कानाखाली वाजवत नेहा म्हणाली.
"सॉरी मॅम.. प्लीज मॅम मला मारु नका" रश्मीने गुडघ्यांवर बसत नेहाचे पाय धरले.
"अरे वा... मस्तच... मजा येतेय मला... पण इतक्या लवकर नाही सुटणार तू. तुझी शिक्षा अजून बाकी आहे"
रश्मीची मान वर करुन बघायची हिंमत होत नव्हती.
नेहाने शांतपणे सिगरेट बाजूला ठेवली. खराब पॅच कॉर्ड टेबलवर पडली होती ती उचलून घेत तिचे दोन्ही टोक हातात धरुन तिचा वेढा केला.
रश्मीच्या कमीजला पाठीवर झिप होती. नेहाने ती खाली खेचली आणि कमीज हाताने थोडासा बाजूला सारला. रश्मीची गोरीपान पाठ नेहासमोर आता उघडी होती. रश्मी भितीने कापू लागली पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
कॉर्ड हवेत फिरवत नेहाने रश्मीच्या पाठीवर ताडकन फटका दिला. रश्मीकडे आता ओरडण्याचेही बळ नव्हते.
ताड... ताड.. एक एक करत नेहाने रश्मीच्या पाठीवर दहा-बारा फटके दिले. केबिनचे दार लावलेले असल्याने बाहेर आवाज जात नव्हता.
रश्मीच्या पाठीवर अनेक वळ उमटले होते. नेहाने तिला खांद्याला पकडून खसकन उभे केले त्यानंतर तिच्या पायावर, पोटरीवर, मांडीवर कॉर्डने फटके देत राहिली. रश्मी हुंदके देत फटके खात होती. जणू 'फटके खाणे' हेच कर्तव्य असल्याप्रमाणे अगदी विनातक्रार, तोंडातून शब्दही न काढता ती फटके खात होती.
अखेर नेहा थांबली आणि तिने कॉर्ड बाजूला ठेवली. रश्मीचे अंग अजून कापत होते. ती हुंदके देत होती आणि नेहाकडे बघायची तिला अजिबात हिंमत उरली नव्हती.
काही क्षण तसेच गेले. मार पडायचा थांबला आहे हे लक्षात आल्यावर रश्मी पाठीवरची झिप लावायचा प्रयत्न करु लागली. पण कापऱ्या हातानी तिला ते जमेना.
"थांब.. मी लावून देते. " नेहाच्या आवाजात अजूनही जरब होती. तिने रश्मीच्या दंडाला धरुन खसकन वळवले. रश्मीच्या पाठीवरचे वळ बघून तिला आनंद होत होता.
"आणि ऐक... यातलं काहीही शेखरला कळता कामा नये" नेहाने बजावले.
रश्मीने काहीच उत्तर दिले नाही.
"काय म्हणतेय मी? समजल नाही का? " नेहाने दरडावून विचारले.
रश्मी आवंढे गिळत होती त्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही.
रश्मीच्या चुडीदारची झिप अजूनही खाली होती. नेहाने जळती सिगरेट उचलून त्यावरची राख झटकली आणि रश्मीच्या पाठीवर सिगरेटचा चटका दिला.
"अगं आई गं... " रश्मी कळवळून ओरडली.
"बोल सांगशील का शेखरला काही? " पुन्हा एक चटका देत नेहाने विचारले.
"नाही सांगणार, खरंच नाही सांगणार" रश्मी घाईने म्हणाली.
"गूड" म्हणत नेहाने सिगरेट विझवली.
"आणि ऐक... एखादं चांगलं मलम घेवून सकाळ संध्याकाळ पाठीला लाव, तीन चार दिवसात वळ गेले पाहिजेत. आणि मला पुन्हा अजून मार द्यावा लागेल अशी वागू नकोस. समजलं का? " झिप लावत नेहाने बजावले.
रश्मीने रडतच मान डोलावली.

[समाप्त]
ही कथा ब्लॉगरुपाने खालील लिंकवर उपलब्ध आहे.
दुवा क्र. १