आठवण..

आठवण

हरवले डोळे अन
अबोल झाले मौन
आठवणींच्या जाळ्यांत
अडकले माझे मन

ताटातूट तुझी अन माझी
रात्र आहे बेचैनं
आठवणींच्या वर्षावात
भिजते आहे वचन

कळलेच नाही कधी
हातातून हात निसटून गेला
धुळीत माखतो आहे
आठवणींचा शेला

राजेंद्र देवी