मं पा २ - खरं की काय?

खरं की काय ?


शनिवारी खातात चणे !


ते डुक्कर होतात म्हणे !!


 


रविवारी लवकर उठतात !


त्यांना दोन शिंगे फुटतात !!


 


सोमवारी खातात पान !


त्यांचे होतात लांब कान !!


 


मंगळवारी अभ्यास करतात !


त्यांच्या केसांत उवा भरतात !!


 


बुधवारी तोडतात फुले !


त्यांचे होतात मोठ्ठे कुले !!


 


गुरुवारी खातात उसळ !


त्यांच्यामागे लागते मुसळ !!


 


शुक्रवारी आंघोळ करतात !


त्यांना येऊन पोलिस धरतात !!


- मंगेश पाडगांवकर


मंगेश पाडगांवकरांच्या मला आवडणाऱ्या काही रचना इथे देतो आहे. आपल्याला देखिल आवडतील अशी अपेक्षा !


शशांक