विचार आणि कर्म

                                    विचार आणि कर्म हे परस्परांशी संबंधित आहेत असे मला वाटते. माणूस वेगवेगळी कर्म  करतो. काही चांगली तर काही वाईट . वेगवेगळ्या कर्मांचे वेगवेगळे परिणाम असतात. अशी कर्म माणूस मरेपर्यंत करीत राहतो. तो त्याचे भोगही भोगतो. त्याच्याबरोबर त्याचे घरातले लोकही ती भोगतात. पण ही प्रक्रिया तो मरेपर्यंत समजेल अशी घडते. ज्यावेळी माणूस मरतो. तेव्हा त्याच्या कर्मांचे भोग कोणी भोगायचे 

तर त्याच्यावर अवलंबून असलेली संबंधित माणसे भोगतात. पण अशी माणसं जर नसतील तर त्या कर्मभोगांचं काय होतं ? तर ती दूरान्वयेही संबंधित व्यक्तींना भोगावी लागतात. तेही जर नसतील तर आजूबाजूचा समाज ती फळं भोगतो. कारण माणूस मरतो तेव्हा देहाशी संबंधित कर्मभोग त्याच्यासाठी तरी नष्ट होत असावेत. कारण अशी कर्म जर पुढे भोगण्यासाठी साचत गेली तर आत्म्याची प्रगती कशी होणार ? कारण तो नवनवीन  अनुभवांसाठी नव्या नव्या परिस्थितीत जन्म घेत असावा. प्रत्येक न्माची कर्म नवीन आणि भोगण्याची पद्धत मात्र वर लिहिल्ये अशी असावी. नाहीतर  आत्मा  अस्तित्वात असलेल्या चैतन्यात विलीन होणार तरी कसा . हे झालं रणानंतरचं. अर्थातच हे फक्त तर्क आहेत. मेल्याशिवाय कळणं कठीण आहे. म्हणूनच सदविचारांचं महत्त्व आहे. मृतात्म्याचे जे कर्म भोग त्याला बरोबर नेता येत नाहीत . ते आजूबाजूचा समाज भोगतो. तो सुद्धा कसा, की ज्यांचे विचार चांगले त्यांच्या वाट्याला चांगले भोग येतात आणि वाईट भोग अर्थातच वाईट विचार असणाऱ्यांच्या वाट्याला येतात. म्हणून विचार करताना चांगले विचार करावेत कारण जगात चांगले विचार फिरत असतात. तीच परिस्थिती वाईट विचारांची आहे. असे फिरणारे बेवारशी विचार त्या त्या विचाराकडे ओढले जात असावेत.  
                                      चांगले विचार , शुभ बोलणं (म्हणजे आताच्या पटणाऱ्या भाषेत पॉझिटिव्ह) वाईट संगती पासून दूर राहणं हे आपल्या कर्माची प्रत सुधारण्यासाठी आणी* समाज सुधारण्यासाठी आवश्यक आहे. तोच प्रकार वाईट कर्मांचा आहे. फक्त ते नकारात्मक आणि स्फोटक
तसेच समाजविघातक कृत्ये करणाऱ्याला लावणारे आहेत. थोडक्यात काय तर जे केलं  ते याच जन्मात स्वतः आणि समाजाला भोगावे लागते.
याच विचारांनी पाहायचे झाले तर जे संत (म्हणजे मुक्तात्मे , बुवा बापू नाहीत) व जीवन मुक्त पुरूष आहेत त्यांच्या कर्मांचा वारसा पण समाजालाच मिळतो. त्यांच्या अवतीभोवती असणारे चांगले लोक त्यांच्या सात्त्विक कर्मांचा वारसा भोगतात तर त्यांच्या वाईट कर्मांचा वारसा  त्यांच्या संपर्कात 
येणारे वाईट लोक भोगतात. पण या सगळ्या विचारांचा उहापोह कुणी परकीय माणसाने केला तर आपण तो लगेच मानायला तयार होतो. आणि त्याला त्याने कशी विज्ञान निष्ठ पद्धत शोधून काढली म्हणून आपण त्याचे कौतुक करतो. याचे मात्र आश्चर्य वाटते. माझ्यासारखे विचार आपल्याही मनात येत असण्याची शक्यता आहे . तरी यावर आपले काय म्हणणे आहे ते लिहावे ही विनंती.

(संपादित)