श्रावण नवा...

श्रावण नवा...

पांगले ढग रविकिरणे चकाकली
पानोपानी हिरवाई तकाकली
ओली जमीन अन गार वारा
धरित्रिने पिसारला हिरवा पिसारा

नटली वसुंधरा हि अशी
जणु नवयोवनेचा शालू नवा
नको होउस कासावीस मना
दर वेळेस येतो श्रावण नवा

राजेंद्र देवी