बाँम्बस्फोट

कुठेतरी गुरफटत ओढत नेतय माझ मन मला

मनात फुटत असतात रोज अणू रेणु बाँम्ब ,
चिथड्या चिथड्या  शरीराच्याही रोजच होत असतात
हलकेच कधी गरम हवेत फुंकर घालावी अशी तिची कल्पना दिलासा देत असते अधे मधे 
बाहेरच्या जगाची चिंता कधीच सोडलीय मी
कारण... माझ्यातच मी एक माझ जग बनवल आहे ,
जे रोज बसत आणि उध्वस्त होत असत अचानाक 
मीच नेतो मझ प्रेत रोज स्मशानात..,उध्वस्त अग्नीत उध्वस्त  मी
एक दिवस यावा आणि बदलून टाकावे सर्व काही असे म्हणत म्हणत दिवस संपून गेलेत आणि बदलत गेले ते.....
ते फक्त जग माझ्या मनातले.. रोज सकाळ! दुपार ! संध्याकाळ!!! 
आणि या जगात  एकटाच बाँम्बस्फोटाची दाह सहन करणारा मी,कुठला बदल शोधत असतो?????
                                                                                                                ----स्नेहदर्शन