आठवणींच अमृत...

आठवणींच अमृत...

आकाशाचे रंग फाटलेले
मनात मळभ दाटलेले
जीर्ण वस्त्र हे आठवणींचे
अनेक धागे तुटलेले

करतो रुजवात मी मनाची
आठवून क्षण ते भेटलेले
नाही बहरत आता हे
आयुष्य माझे वठलेले

कसा जगू अन किती जगू
जीवन हे विस्कटलेले
सांग कसा मरू मी
मनात अमृत साठलेले

राजेंद्र देवी