अवसेची रात्र आणि एक पणती

निराश क्षणी एक पणती ही आपल्याला वाट दाखविते.  
अवसेच्या राती
निराश मनी
पेटविते ठिणगी आशेची.
एक पणती

अवसेच्या राती
पांढर्या बुरख्या खाली
लपलेले काळे चेहरे
दाखविते जनतेला.

एक पणती
अवसेच्या राती
सत्य आणि न्यायाची
प्रेमाची आणि सोख्याची
पेटवू आपल्या हृदयी.