न कळलेली कविता

प्रेमाचे हितगुजही
मला कळत नाही.

देवाची करूणाही
कधी भाकली नाही.

मला दिसते नेहमी
नग्न सत्य एक

लोकांना ओरडून सांगतो ते
पण कुणीच ऐकत नाही.
कधी-कधी माझी कविता
मलाच कळत नाही.