वासुदेव...

वासुदेव...

रोज पहाटे टाळ वाजवीत म्हणे
वासुदेव आला वासुदेव आला
कोणी दिले अथवा ना दिले
म्हणे दान पावला दान पावला

बऱ्याच दिवसात नाही दिसला
कोठे लोप पावला?
परवा अचानक तो दिसला
पाहून मंदसा हसला

घेता कडोसरीस दान
आशीर्वाद त्याने दिला
सुखाच्या वाटचालीत
आहेत त्याची दोन पावलं

आयुष्याच्या या संध्याकाळी
कानात पुन्हा टाळ धुमला
लेऊन मोरपिसाची टोपी
कृष्ण सखा आला कृष्ण सखा आला

राजेंद्र देवी