तो मला टाळत आहे...

तो मला टाळत आहे...

सरळसोट आयुष्य माझे
नव्हतेच कोणते वळण
होते उंच सखल ते
अवघड होते कळणं
दुःखाच्या जोडीला नव्हते 
कोणतेच सुख
त्याला काय माहीत 
कोरड्या वातीचं जळणं
कमी का भोगले
सोसले आतल्या आत
नाही पटत आता
यमराजाचं टाळणं
राजेंद्र देवी