प्रत्येकजण आपापलं वेड घेऊन चालत आहे...

प्रत्येकजण आपापलं वेड घेऊन चालत आहे...

कुणी त्याला स्वप्न म्हणून गोंजारतं
कुणी त्याला ध्येय म्हणून बाळगतं
कुणी त्याला आशेनं जोपासतं
कुणी नाइलाजानं पाठपुरावा करतं...
शेवटी वेड ते वेडच राहतं...
त्यानं काही साध्य होत नाही
पण ते चालणाऱ्या माणसाची सोबत करतं;
त्याला चालण्याची शक्ती देतं
म्हणून माणूस चालत राहतो...

प्रत्येकजण आपापलं वेड घेऊन चालत आहे...
हे बरंच आहे; नाहीतर
प्रत्येक जण उरेल एकाकी वा थकलेला...
शहाणपण माणसाची शक्ती किंवा सोबत नाही ठरत
फार वेळ...