इंग्रजी भाषा ही एक भारतीय भाषा झालेली आहे का?

     मध्यंतरी एका इंग्रजी भाषेतील ब्लॉगवर परदेशी भाषा व स्थानिक भाषांबाबत चर्चा वाचली. अनेक मुद्यांमधे शिक्षणाचे माध्यम काय असावे, हा ही एक मुद्दा  होता. ब्लॉग तयार करणाऱ्या भारतीय लेखिकेने लिहिले होते- आम्ही घरात इंग्रजी बोलतो. इंग्रजीला आता परकीय भाषा म्हणून दूर सारू नये. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी  इंग्रजी परकीय भाषा राहिलेली नसून भारतीयच भाषा झालेली आहे.
    प्रश्नः  इंग्रजी भाषा एक भारतीयच भाषा झालेली आहे का?
           भारतीय भाषांनी इंग्रजी भाषेतील अनेक शब्द स्वीकारले आहेत. आज कदाचित् ती भारतीय भाषा नसेल पण अजून पन्नास वर्षांनी परिस्थिती काय असू शकेल?