वाहती गंगा

मानवाला जीवन आहे 

जगणे निरर्थक आहे 
विक्रीस प्रेम हे आहे 
भावनांची कुचंबणा आहे
प्रेमाला पाझर फुटतो
पैशाची झालर दिसता 
जात, धर्म, पक्ष, गटाचे 
राजकारण चाले पैशाचे
देशाला भिकेस लावे
रोज रोज भकास व्हावे
शेतकरी पिकवी धान्य 
व्यापारी उचली धान्य
आत्महत्या रोजचीच आहे
सरकार उदासीन आहे
निढळाचा घाम सुकेना
डेंग्यू कुणासही सोडेना 
रात्रीचा दिवस करूनी 
डंख दिवसा करीत आहे
गरीब वाट पाहतो
कोण आता बदल आणतो
तापल्या तव्यावर तुम्ही 
भाजुनी घ्या आपुली पोळी 
का धुऊन घेणार नाही 
हात वाहत्या गंगेत कोणी 
कविता बसून आहे 
शब्दांना शोधत आहे.