हॉस्पिटलाच्या खाटेवरती

हॉस्पिटलाच्या खाटेवरती 

जगणे तिला कठिण झाले
जीवघेणा रोग कर्क
तरीही तिला "जग" म्हणालो
कसेनुसे हासुनी ती म्हणाली
"कच्ची  बच्ची पडतील उघडी
करा डोळे कोरडे तुमचे
मातृत्वही स्वीकारा तयांचे 
समजून घ्या त्यांच्या  चुका 
अन कौतुकाची साथ द्या त्यांना
हात उचलू नका कधीही 
झिडकरणेही द्या सोडुनी 
तुमचाच आधार त्यांना 
त्यांचे गुरू तुम्हीच आता "
आणखीनही सांगणे होते तिचे 
पण शब्द मुखातच विरले
पुढच्याच क्षणी विझून गेली 
काळोखात दुनिया बुडाली