आठवणींचे बेसूर

आठवणींचे सूर  काही वेळेला 

इतके  बेसूर असतात
की बऱ्याच वेळा
ते भेसूर होतात 
मग रडण्याला गाणं
म्हंटलं जातच असं नाही
आणि गवयाच्या मुलाला 
गायन येतच असं नाही 
पण गाणं तयार व्हायला
हे पुरेसं आहे
नाहीतरी चिखल लागतोच 
कमळ उगवायला 
म्हणूनच हळुवार आठवणींचे 
चुकून तरंग येतात कधी कधी 
जीवनावर प्रेम करायला 
तेवढेच पुरेसे होतात
आठवणींची दलदल 
खोल खोल असते
तळाशी मात्र तिच्या 
नेहमीच मळमळ असते
तुम्हाला काय वाटतं ?
दलदल, मळमळ , तरंग 
सारखेच आहेत ........?
का एकाच दलदलीची ती 
अनेक रुपे आहेत .........?