आठवण..

माझ्या आयुष्यात कळी बनून आलीस तू,
फुलासारख हळुहळू फुलवलस तू,
सुगंधान तुझ्या, अनेक रंग भरलेस तू,
जीवनाचा माझ्या पारिजात केलास तू॥
तुझ्या बोलणातला तो अल्लड बोबडेपणा,
धावण्यातला अवखळ दुडुदुडुपणा,
चेहऱ्यावरचा निस्वार्थी निरागसपणा,
हाच तर माझ्या जगण्याचा होता बहाणा॥
आठवतात, तुझे ते सर्व हट्ट,
अनं ते पुरवण्यासाठी केलेले यत्न,
तुझा तो खट्टु चेहरा हुर हुर लावतसे मनाला,
फुलवण्यास हसू त्यावरी लावतसे मी सर्वस्व पणाला॥
तुझ्या बोलक्या डोळ्यांमधली उत्सुकता,
तुझ्या ईवल्याश्या ओठांवरची मधुरता,
नव्हे तर, मुक्त कंठानी केलेला आक्रोशसुद्धा,
अगदी वाटायचा हवा हवासा॥
तुला मोठी होत असता बघताना होत असे मला आनंद,
अन, तु लांब जाण्याच्या विचारानी होत असे मी स्तब्ध,
आजही आठवणी जुन्या बाळगून उराशी,
ठेवतो तुझी खेळणी झोपताना उशाशी॥
ख़रच....
दुरावलेल्या या बाबाची येत असेल का ग तुला पण आठवण,
कधितरि, कुठेतरि, केव्हातरि आठवत असतील का ते जुने क्षण,
संसाराचा गाडा ओढता ओढता जगणच विसरलो मी
आयुष्याच्या सारीपाटावर आता एकटाच उरलो मी.....
एकटाच उरलो मी ..