नॉर्वेबद्दल बोलू काही...

नॉर्वे म्हटलं की डोळ्या समोर येत ते म्हणजे मध्य रात्रीचा सूर्य. त्या पाठोपाठ नॉर्दर्न लाइट  आणि डॉग स्लेज. पण त्याही पेक्षा अनेकांना नॉर्वे बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकजणांना असते. मुख्य करून ज्यांनी बराच महिने नॉर्वे मध्ये वास्तव्य केले आहे त्यांच्या मित्र-आप्तेष्ट कडून.
    नॉर्वे हा युरोप खंडात UK च्या ईशान्य ( नॉर्थ-ईस्ट ) दिशेला, अवघ्या ५१ लाख लोकसंख्या चा देश. या देशातील बहुतेक भाग हा डोंगर, दर्या व लांबच लांब आत आलेल्या खड्यांनी व्यापला आहे. याच खड्यांना येथे फियोर्ड (Fjord) म्हणून संबोधले आहे. सोग्ने फियोर्ड १ (Sognefjord) जगातील सर्वात लांब २०५ की. मी. चा नॉर्वे मध्येच आहे. या सारख्या फियोर्ड मधून फिरण्याची मजा काही वेगळीच.
      इकडचे वातावरण बाराही महिने थंड असले तरी उन्हाळ्या मध्ये तापमान २५°C पर्यंत सरकते. एप्रिल महिन्या पासून इकडे उन्हाळ्याची चाहूल लागते व परिसर हिरव्या रंगाची चादर पांघरायला  सुरवात करतो. त्या मध्ये अधून मधून पावसाची हजेरी असतेच. पुढे ऑक्टोबर महिना येतो तसतसं वातावरण थंड होण्यास सुरवात होते. डिसेंबर महिना येई पर्यंत देशातील बहुतेक भागात बर्फ वृष्टी होते.
       नॉर्वेतील बहुतांशी जन हे ख्रिस्त मधील लुथेरान २ समुदायातील आहेत. लाकडी बांधणी शैलीतील असलेले ११३० मधील Urnes Stave church३ हे नॉर्वेतील सर्वात जुने चर्च म्हणून ओळखले जाते. याला युनेस्को (UNESCO) ने world heritage sites चा दर्जा दिला आहे.
      ख्रिस्त समुदाय व्यतिरिक्त इथे इतर धर्म-समुदायातील जन गुण्यागोविंदाने राहतात. आज हिंदू धर्माचे येथे जवळपास ७००० जन राहतात. १९१४ मध्ये  स्वामी आनंद आचार्य४ हे प्रथम नॉर्वे मध्ये आले अशी इंटरनेट मध्ये नोंद मिळते. ते हेडमार्क मधील अल्वदाल येथे वास्तव्याला होते. नंतर पुढे १९८८ मध्ये सनातन मंदिर सभा आणि विश्व हिंदू परिषद - नॉर्वे याची स्थापना झाली. माझ्या माहिती पैकी आज नॉर्वे मध्ये हिंदू ची ४ मंदिर आहेत. द्रम्मेन आणि स्लेम्मेस्ताड येथील हिंदू सनातन मंदिर (स्थापना-१९९७ ) आणि तील्लेर येथील गणेश मंदिर (स्थापना-२००५). बेर्गेन येथील गणेश मंदिर. तील्लेर येथील गणेश मंदिर हे जगामधील सर्वात उत्तरे कडे असलेलं मंदिर असेल.
       आता नॉर्वे च्या इतिहास बद्दल. त्यासाठी आपल्याला जवळ जवळ १२०० वर्ष मागे जावे लागेल. सन ८७२ मध्ये नॉर्वे परिसरातील अनेक प्रांतातील राज्य एकत्र येऊन हाराल्ड फेइरहेईर (Harald Fairhair) यास प्रथम नॉर्वेचा राजा म्हणून घोषित करण्यात आले. पुढे १४व्या शतकापर्यंत नॉर्वे आणि परिसरातील प्रांतातील राज्यांमध्ये अनेक संघर्ष आणि लढाया झाल्या. हे थांबविण्यासाठी नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क यांची १३८७ साली कालमर युनियन ची स्थापना करण्यात आली. मार्गरेट हि नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क याची राणी झाली. नंतर १५२३ मध्ये स्वीडन कालमर युनियन मधून बाहेर पडला. पण नॉर्वे आणि डेन्मार्क युती मोडली नाही. हि युती १८१४ पर्यंत टिकली. याच १८१४ वर्षी नॉर्वे ने स्वतःची राज्य घटना प्रस्तापित केली. पेडर अंकेर हा नॉर्वेचा पहिला पंतप्रधान. राज्य घटना अस्तित्वात आली तरीही राजेशाही सुरू  राहिली. १९१४-१९०५ या दरम्यान नॉर्वे व स्वीडन यांचा एकत्रित राजे होते. सन १९०५ मध्ये स्वीडन हि वेगळा झाला आणि नॉर्वे हा देश खऱ्या  अर्थाने स्वतंत्र झाला. हाकोन-७ हा स्वतंत्र नॉर्वे चा पहिला राजा.
       १९६९ मध्ये नॉर्वे ला एकोफिस्क येथे प्रथम इंधनतेलाचा शोध लागला. पुढे तेल उद्योग आणि कारखाने सुरू झाल्याने येथील आर्थिक स्थिती बळकट झाली. दळणवळण, मूलभूत गरजा, पायाभूतसुविधा, पर्यटन यांचा विकास झाला. आज हा देश उच्च राहणीमाना मध्ये सर्वात पुढे आहे.
         नोर्वेजियन हि या देशाची राष्ट्र भाषा आहे. त्यामध्ये बुकमोल आणि निनोस्क हे दोन प्रकार अधिकृत आहेत.. मराठी भाषेतील "द", "क्ष " इत्यादी. या सारखे काही उच्चार नॉर्वेजियन भाषेतील शब्दांमध्ये  उच्चारले जातात.
         नॉर्वेजियन खाद्य पद्धती मध्ये खूप प्रकार नाहीत. मासे, मास, काही ठराविक पालेभाज्या, बटाटे, चीज, ब्रेड हे इकडच्या पारंपरिक खाण्या मध्ये असतात. येथे अनेक देशातील लोक राहत असल्याने, त्यांना त्या प्रकारचे खाद्य सुपर मार्केट मध्ये मिळून जाते. भारतातील खाद्य पदार्थ येथील असलेली एशियन सुपर मार्केट मध्ये मिळतात. त्यामुळे भारतीय खाद्य पद्धती चा प्रश्न मिटला आहे.
तर असा हा नॉर्वे.

हरेश विजय तुपे