एकच प्याला, चार शक्यता, चार जोड्या!!

अर्धा भरलेला प्याला आणि त्यासंदर्भातला आशावाद/निराशावाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. त्याबाबतचे माझे नवे विचार मी खाली मांडले आहेत: आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.

पण आता दोन्ही प्रकारच्या व्यक्तीसंदर्भात दोन शक्यता वर्तवता येतात:

(१) आपण प्रथम आशावादी मनुष्याचा विचार करू:

(१-अ) आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो त्यामुळे त्यात तो समाधानी होतो आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी कधी प्रयत्नच करत नाही.

किंवा

(१-ब) आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो त्यामुळे त्याचा आशावाद त्याला उरलेला अर्धा प्याला सुद्धा भरायला उद्युक्त करतो.

(२) आपण आता निराशावादी मनुष्याचा विचार करू:

(२-अ) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे त्यात तो समाधानी नसतो आणि त्याला तो पूर्ण भरण्याची ऊर्मी मिळते.

किंवा

(२-ब) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे तो अधिक निराश होवून प्याला पूर्ण भरण्याचा विचार सोडून देतो.

तुम्हाला काय वाटते कोणती जोडी बरोबर आहे?

जोडी १- (१-ब) आणि (२-ब): आशावादी असणे चांगले!

जोडी २- (१-अ) आणि (२-अ): निराशावादी असणे चांगले??? (काय सांगता?)

जोडी ३- (१-ब) आणि (२-अ): कोणताही "वादी" असले तरी परिणाम चांगलाच??? असे कसे? असे कसे?

जोडी ४ - (१-अ) आणि (२-ब): कोणताही "वादी" असले तरी परिणाम वाईटच??? असे कसे? असे कसे?