पेच गहिरा

त्या दूरवरल्या धरणीवर

हळूच वाकता अंबर
मी टाळली नजर
तर, कोवळ्या, नाजुक वेलीसह
दिसे लगटता पवन
मी झाकले नयन
तो, मिटल्या डोळ्यांच्या अंधारात
दिसे हृदचोर लपलेला
काय करू नजरेला ?