प्रश्नोत्तर

आहे स्वार्थमयच हे जग जर

का सरिता समर्पित हो दर्यास ?
वेडे, नसते समर्पण ग ते
ती तर मिळ्वी स्वाथ्यनिवास !
आहे जडच जर दुनिया ही
का तरल येथे भावोत्कटता ?
छे, कसची ती उत्कटता ग
मार्ग एक तो सौख्य मिळण्याकरता !
नाशिवंतच जर सारे अखेर
का टिकण्यास धडपड ही अत्यंत ?
अग, पेटवूनच जर दिले आहे
जळावेच लागते ना संपेपर्यंत ...!