एकदा

आली नाही चाहुलही

माझ्या कानी
हळुच येऊन बसली
नभकुशीत संध्याराणी
गोड गुलाबी तेज तिचे
अलगद विखुरले
कवितेच्या वहीबरही
लाडाने लवंडले
काव्यलिखाणातील भान
काव्यातच आणी
हळुच येऊन बसली
नभकुशीत संध्याराणी