हरवलेली कविता

अपरात्री शिरून मनात माझ्या

केले तियेने लाडिक गुंजन
अर्धोन्मिलित नयनांनीच
मी पाहिले तिचे नर्तन
प्राजक्ताच्या सुमनांसम
शब्द असे टपटपले
पखरणीतच धुंद होऊन
स्मृतीतही ना गोळा केले
तिच्या हरविण्याने आता
बसले स्वतःसही हरवून
अपरात्री शिरून मनात माझ्या
केले तियेने लाडिक गुंजन