काय मी असलो तरी अन काय मी नसलो तरी

सस्थ का बसणार आहे काळ ,मी बसलो तरी

काय मी असलो तरी अन काय मी नसलो तरी 

ह्या तुझ्या न्यायीपणावर हासतिल सारे उद्या
की मला होतेय फाशी फक्त खसखसलो तरी

कोण तू आहेस माझी कोण मी आहे तुझा
भेट का घेशील माझी मी तुला दिसलो तरी 

व्हायचे असतेच असते ते कसे टाळायचे 
दुःख का संपेल माझे खूप फसफसलो तरी

ओल काठांना म्हणे आतून यावी लागते 
तू कुठे भिजशील मी बेधुंद पावसलो तरी

वीट म्हणजे आपले मन हे मला वाटायचे 
मी उभा ठाकू न शकलो पण चला ठसलो तरी 

...वैवकु