संसार नांदवायला

संसार करण्या आयुष्य लावते पणाला
दिव्यासारखी जळते आणि दही दिशा उजळूनी लावते
ती म्हणजे फक्त "स्त्री"
एक पती म्हणून प्रत्येकच वेळी जबाबदारीने  वागवू नका।
बिदास्त  होऊन मला माझे  क्षण द्या ।
तो वेळ द्या जो मी मारतेवेळी आठवून  मरणाला हि सुखाने  जवळ करेल
…. कारण मला  तेव्हा माहिती असेल कि  मी एक पत्नी होती …
जी केवळ पतीच्या कोवळ्या प्रेमानेच  जगली …।
मला जगापुढे कुट्लाही अधिकार, हक्क नाही दिला तरी चलेल…
मात्र तुमच्या जीवनातील गोड क्षणाची भागीदारिणी म्हणून
तुमच्या विचारांची ,शब्दांची  वाणी ऐकण्यासाठी मीच ऐकठी होती म्हणून हाक द्या ….
हिऱ्या-सोन्याच्या  वस्तू नाही दिल्या तरी चालेल पेंशाची तुलना नाही केली तरी चालेल .,,
पन… या शरीरातून प्राण जातेवेळी मला मांडीवर घेऊन तेच शब्द बोला
 जे मी ऐकण्यासाठी च माझा शेवटचा श्वास तुमच्या कुशीत सोडेल …
फक्त ह्याच वचनाने कि यानंतरही आपली भेट ह्या विश्वाच्या पलीकडे होईल ….
हो एक  पत्नी म्हणून,, तुमची जीवनसंगिनी म्हणून मागेल मी वचन तुम्हाला आयुष्यात ….
जगलो आपण ऐकमेकांसाठी ….
ऐकमेकांच्या सुखा-दुखा साठी ….
ऐकमेकांना सोनेरी क्षण देण्यासाठी ……
ऐकमेकांना प्रेमाची रीत शिकवण्यासाठी …
ऐकमेकांना वचने देण्यासाठी ……
मी जाईल  फक्त तुमच्याच कुशीत ,,
लाल कुंकवान भरवाण  माझे कपाळ तुम्ही  
हिरव्या शालुने नटवाल तुम्ही
अलगद जवळ येउन ओथंबून वाहणारे तुमचे अंश्रू  पाजतील मला अख्रचे जलतरु …
आणि  तेव्हा नि:शब्द  होऊन हाका  माराल मला ओरडू -ओरडू…
नावानेच बोलवाल हा मला ….
"अंग ये ऐकतेस का " अस भल्या आयुष्यात म्हटल होत का कधी  हेहि  आठवाल  त्या क्षणी …
पदर  माझा घेऊन हातात ,सोडविणार नाही तुम्हाला …
पण मिठीत  घेऊन  म्हणाल मला,
"  राणी  मी  येईल  तुझ्यासाठीच परत तुझ्याजवळ … संसार  नादवायला"

२२ऑगस्ट २०१४
१२:१४am

श्वेता मेश्राम ….