या दुनियेच्या बाजारात

राहतेस भर दुनियेत अगदी
परी समजू नकोस हं असे
की वाचेल कुणी
तुझ्या मनाचे उघडून पुस्तक
अग, या दुनियेचा बाजारात
आहे कुणाला फुरसत ?
स्वार्थाच्या कोलाहलात
विकारांच्या गर्दीतून
व्यवहाराच्या वाटेवरून
चाललेत सारे
स्वतःला सांभाळून
लाभ जेथे ना धनाचा
त्या तुझ्या मनात
डोकावण्याची तरी का
कुणा असावी जरुरत ?
या दुनियेच्या बाजारात
आहे कुणाला फुरसत ?
तुडुंब सदा नयनी आसू
तरी डोळ्यांचे तळे का खोल गेले?
त्या आसवांचा ओलावा सदैव लाभूनही
कसे गालांवरचे गुलाब सुकले?
कुणीही नाही ग प्रश्न फालतू
असले सोडवत
या दुनियेच्या बाजारात
आहे कुणाला फुरसत ?