राजकारण

प्रत्येक माणसाच्या जगण्यात राजकारण
बहुतेक या हवेच्या रक्तात राजकारण

कळले मला न केंव्हा मज रोग लागला हा
ती बोलता समजले माझ्यात राजकारण
सोबत हवी तयांना माझी पदोपदी क?
त्यांच्या कुशीत माझे असण्यात राजकारण

नुसते जगावयाला साधे सरळ असावे,
इच्छे नुसार जगण्या हातात 
राजकारण

माझी महाग भाजी विकली कधी न गेली
नेता विकून आला स्वस्तात 
राजकारण
                                            ---स्नेहदर्शन